नागपूर,
rashtr-sevika-samiti शिवाजी सभागृहात रविवारी (१६ नोव्हेंबर) आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या बालिका शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत झालेल्या या शिबिरात नी-युद्ध, दंड प्रात्यक्षिक आणि वंशीवादनाचा आकर्षक सराव बालिकांनी केवळ एका आठवड्यात आत्मसात करून उत्कृष्ट पणे सादरीकरण केले.
शाखेची प्रार्थना देखील लहान बालिकांनीच आत्मविश्वासाने सादर केली. rashtr-sevika-samiti मुख्य अतिथी शिल्पा नंदनपवार यांनी मुलींना समजेल अशा सोप्या भाषेत प्रेरणादायी गोष्ट सांगून संवाद साधला, ज्यामुळे सर्व बालिका एकाग्रतेने ऐकत होत्या.शिबिराचा समारोप ‘वंदे मातरम’ने झाला.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे,संपर्क मित्र