मुंबई,
Rituraj's match-winning innings दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला ओपनर ऋतुराज गायकवाड सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका ‘ए’ विरुद्धच्या 3 मॅचच्या अनधिकृत वनडे सीरिजमध्ये त्याने दमदार कामगिरी केली असून प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार जिंकला. या सीरिजमध्ये ऋतुराजने 105 च्या सरासरीने 210 रन केले. पहिल्या सामन्यात त्याने 129 बॉलमध्ये 117 रन केले, ज्यात 12 फोरचा समावेश होता, तर दुसऱ्या सामन्यात 83 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले. या कामगिरीमुळे भारताने दोन सामने जिंकले आणि ऋतुराजची मॅच विनिंग खेळी चाहत्यांच्या लक्षात आली. दुखापतींमुळे मागील काही काळ क्रिकेटपासून दूर असलेल्या ऋतुराजने कमबॅक करताच उत्कृष्ट शतक आणि अर्धशतक झळकावले. सध्या शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे टीम इंडियाला संधी नाही, त्यामुळे ऋतुराजला आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी 6 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याच्या कामगिरीनंतर पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.