नागपूर,
Saint Kaikadi Maharaj संत कैकाडी महाराज यांच्या ४६व्या पुण्यतिथी निमित्त रामेश्वरी येथे तीन दिवसीय भक्तिमय कार्यक्रम पार पडले. महोत्सवाची सुरुवात स्वच्छता अभियान, दीपप्रज्वलन व अभिषेकपूजनाने झाली.
शेवटच्या दिवशी दिंडी काढण्यात आली तसेच गोपालकाला, दहिहंडी पूजन व महाआरतीने सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होतेतिन्ही दिवस काकड आरती, भजन, प्रवचन, भारुड, ध्यान-प्रार्थना आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. Saint Kaikadi Maharaj शेवटच्या दिवशी राममधून दिंडी तुळशीराम गायकवाड व सचिन जाधव यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. गोपालकाल्याचे कीर्तन ह.भ.प. रंगराव पांडे व ह.भ.प. सातफळे महाराज यांनी सादर केले.दहिहंडी पूजन व फोडण्याचा सोहळा, महाआरती आणि महाप्रसादाने महोत्सवाची सांगता झाली. परिसरातील नागरिकांनी तीनही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. संचालन सचिन जाधव यांनी केले व आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.
सौजन्य:रमेश मेहर,संपर्क मित्र