नागपुर,
Salil Deshmukh resignation ऐन नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय मुख्यतः वैयक्तिक आरोग्य कारणांमुळे घेतल्याचे सांगितले.
सलील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे ते काही काळ पक्षाच्या कामकाजात पूर्णपणे सक्रिय राहू शकत नव्हते. “सहा महिन्यांपासून माझी प्रकृती खूप चांगली नसल्यामुळे काही काळासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व सोडतो. ही वस्तूतीस्थिती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.राजीनाम्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की, हा निर्णय फक्त प्रकृतीशी संबंधित आहे आणि पक्ष किंवा कुणावरही नाराजी यामुळे नाही. त्यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबाला खूप काही दिले आहे, पक्षात त्यांना सतत मान-सन्मान मिळाला आहे आणि पक्षातले अनुभव त्यांनी खूप महत्त्वाचे ठरले आहेत.
सलील देशमुख Salil Deshmukh resignation यांनी पत्रकारांशी बोलताना पुढे सांगितले की, पुढील काळात ते लोकसेवेच्या कामांमध्ये परत सक्रिय होण्याचा विचार करत आहेत. “येणाऱ्या काळात लोकांमध्ये जाऊन प्रामाणिक लोकसेवा करायची आहे. लोकांमध्ये जनसंपर्क वाढवायचा आहे आणि मोठे प्रकल्प व विकासकामं जनतेसाठी आणायची आहेत,” असे त्यांनी सांगितले.सध्या सलील देशमुख कोणत्या पक्षात जाऊ शकतात, याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष या निर्णयावर केंद्रीत झाले आहे, कारण नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.राजीनाम्यानंतर सलील देशमुख यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट झाले आहे की, पक्षाबद्दल त्यांचा आदर कायम आहे आणि निर्णय फक्त वैयक्तिक कारणांमुळे घेण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात ते राजकारणात कसे सक्रिय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.