स्वरधारा परिवारातर्फे ‘राग रस बरसे’ शनिवारी

20 Nov 2025 19:08:29
नागपूर,
Swaradhara Nagpur स्वरधारा परिवारातर्फे ‘राग रस बरसे’ हा शास्त्रीय रागांवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम शनिवार, २२ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
 
varsha
 
या कार्यक्रमाला जेष्ठ संगीतकार, गायक व संगीत शिक्षक अशोक गोकर्ण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना, संयोजन आणि गायन चंद्रशेखर तासगांवकर यांचे असून संजय कुळकर्णी व अशोककुमार गांधी तांत्रिक व प्रस्तुती सहयोगी म्हणून कार्यरत आहेत. Swaradhara Nagpur विजय रामटेके, श्रीकांत पैठणकर, विवेक सकदेव, चेतन एलकुंचवार, श्रद्धा डाऊ, रोहिणी पाटणकर, मानसी बडे, वंदना कडू आणि मनश्री जोशी हे कलाकार गीते सादर करणार असून निवेदन शिरीष पाटणकर यांचे राहणार आहे. प्रवेश विनामूल्य असलेल्या या कार्यक्रमासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:वर्षा किडे,कुळकर्णी ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0