शिवाजीनगर बागेत सकाळचा योगाभ्यास

20 Nov 2025 17:35:37
नागपूर ,
Shivajinagar Nagpur सकाळची सोनसळी किरणं आणि थंडगार वाऱ्याची हळूशी साद… अशा रम्य वातावरणात शिवाजीनगर बागेत रोज सकाळी नागरिकांची तंदुरुस्तीची मैफल रंगते. प्रातःभ्रमण करतानाच अनेक जण योगासनं, प्राणायाम आणि हलका व्यायाम करून दिवसाची ऊर्जा येथेच साठवतात.

yogi
 
वाहतूक आणि प्रदूषणाचा ताण वाढण्यापूर्वी मिळणारी ही स्वच्छ हवा शरीराला ताजेतवाने करते Shivajinagar Nagpur तर योगाभ्यास मनालाही शांतवतो. त्यामुळेच शिवाजीनगर बागेतील ही सकाळची योगमंडळी परिसरात आरोग्यसंपन्न वातावरण निर्माण करत आहेत.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0