मुंबई,
Sonam Kapoor welcomes second child बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने अखेर आपल्या दुसऱ्या बाळाच्या गर्भधारणेची पुष्टी केली आहे. तिने स्वतःचा बेबी बंप दाखवत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली असून पोस्टमध्ये तिने स्वतःला "आई" म्हणून संबोधले आहे. सोनमने तिच्या पती आनंद आहुजा सोबत एक संयुक्त पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने जाहीर केले आहे की तिचे दुसरे बाळ २०२६ मध्ये जन्माला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोनमच्या गर्भधारणेबाबत अटकळ होती, मात्र तिने किंवा तिच्या कुटुंबाने याबाबत काहीही पुष्टी दिलेली नव्हती. आता तिने स्वतःच या बातमीची पुष्टी करत चाहत्यांसोबत हा आनंद साजरा केला आहे. तिच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पत्रलेखा, शनाया कपूर, सुनीता कपूर, परिणीती चोप्रा, करीना कपूर खान, भूमी पेडणेकर आणि प्रियांका चोप्रा यांनी सोनमच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला.