समाजवादी पार्टीला मोठा धक्का; आमदाराचा मृत्यू

20 Nov 2025 09:14:58
लखनौ, 
sp-mla-sudhakar-singh-passes-away उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. घोसी मतदारसंघातील पक्षाचे आमदार सुधाकर सिंह यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंह बऱ्याच काळापासून आजारी होते आणि रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
 
sp-mla-sudhakar-singh-passes-away
 
समाजवादी पक्षाने X वरील त्यांच्या अधिकृत हँडलवरून आमदार सुधाकर सिंह यांच्या निधनाची घोषणा केली. पक्षाने म्हटले आहे की, "घोसी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार सुधाकर सिंह यांचे निधन झाले आहे. अत्यंत दुःखद! त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देव त्यांच्या शोकाकुल कुटुंबाला हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. श्रद्धांजली!" घोसी मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार सुधाकर सिंह यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. sp-mla-sudhakar-singh-passes-away त्यांनी २०२३ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी फरकाने विजय मिळवला होता. त्यांनी भाजपाच्या दारा सिंग चौहान यांचा ४२,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
 
Powered By Sangraha 9.0