ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

20 Nov 2025 14:45:49
पुणे,
Tamhini Ghat accident ताम्हिणी घाटात झालेल्या भीषण अपघाताची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानगाव महामार्गावरील अवघड वळणावर एका थार गाडीचा ताबा सुटून ती तब्बल ५०० फूट दरीत कोसळली. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा अपघात सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, घटना प्रत्यक्षात तीन दिवसांनंतर प्रकाशात आली आहे.
 
 
Tamhini Ghat accident
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांच्या शोधासाठी त्यांच्या शेवटच्या लोकेशनचा मागोवा घेतला असता तो ताम्हिणी घाट परिसरात आढळला. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने सुरू केलेल्या शोधमोहिमेत दरीत कोसळलेली थार गाडी आणि मृतदेह आढळून आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी शोधकार्य सुरू केले असून दुर्घटनेच्या अचूक कारणांचा तपास सुरू आहे. दरीत कोसळलेल्या गाडीचा शोध लागेपर्यंत अपघाताची कोणालाच माहिती न मिळाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता प्राथमिक तपासात हे सर्व तरुण एकत्र प्रवासाला निघाल्याचे दिसत असून, नेमका अपघात कसा घडला याची चौकशी सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0