'त्या दिवशी मला कळलं… मी स्टार झालो आहे'

विवेक ओबेरॉयची ‘साथिया’च्या काळातील आठवण

    दिनांक :20-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Vivek Oberoi बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. एकेकाळी इंडस्ट्रीत नवा असलेला विवेक आजही चाहत्यांच्या मनात लोकप्रिय आहे. लवकरच तो ‘मस्ती 4’मध्ये झळकणार असून या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. 2002 साली आलेला साथिया हा विवेकच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या चित्रपटात त्याच्यासोबत राणी मुखर्जीची मुख्य भूमिका होती.
 

Vivek Oberoi  
अलीकडेच Vivek Oberoi दिलेल्या मुलाखतीत विवेकने साथियाच्या शूटिंगदरम्यान घडलेली एक आठवण सांगितली. त्याने त्या काळातील लोकप्रियता आणि अचानक मिळालेल्या स्टारडमबद्दल खुलेपणाने बोलत, रातोरात कसे बदललेले आयुष्य अनुभवले, हे सांगितले.विवेक म्हणाला की, “मी, दिग्दर्शक शाद अली आणि राणी मुखर्जी एकत्र शूट करत होतो. राणीने त्या आधी थोडा ब्रेक घेतला होता, पण ती तरीही एक मोठी स्टार होती. मी मात्र पूर्णपणे नवखा होतो. आम्ही गाइटी गॅलेक्सीच्या समोरच्या रेल्वे क्रॉसिंगवर ‘सुहानी’ला चेस करत असलेला एक सीन शूट करत होतो.”सकाळी सुरुवात झालेल्या शूटिंगदरम्यान दुपारी थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांची वर्दळ वाढू लागली. काही लोकांना विवेकला कंपनी चित्रपटातील ‘चंदू भाई’ म्हणून ओळखू लागल्यावर गर्दी काही क्षणात शेकडोंमध्ये बदलली. “थोड्याच वेळात हजार ते दोन हजार लोक जमा झाले. वातावरण हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. शादने मला उचलून मेकअप व्हॅनमध्ये बंद करून ठेवले,” असे विवेकने सांगितले.
 
 
 
गोंधळ शमवण्यासाठी Vivek Oberoi पोलिसांना बोलवावे लागले. त्यापूर्वी शाद अलीने विवेकला व्हॅनमधून बाहेर काढले आणि लोकांसमोर उभे राहून हात हलवण्याचा सल्ला दिला. विवेक म्हणतो, “मी बाहेर पडलो आणि वेव केलं, तेव्हा ज्या आवाजात लोकांनी प्रतिसाद दिला, ते अविश्वसनीय होतं. तेव्हा शाद माझ्या बाजूलाच उभा होता. त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, ‘तु स्टार बन गया मेरे भाई.’ त्या क्षणी मला जाणवलं की हे आयुष्य बदलणारं अनुभव आहे.”विवेक ओबेरॉय सध्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून चाहत्यांनी मस्ती 4ची उत्सुकतेने वाट पाहिली आहे. त्याच्या मते, *साथिया*च्या काळातील अनुभव आजही त्याच्यासाठी अमूल्य आणि अविस्मरणीय आहेत.