यशोमती व आमदार राणा यांच्यात जुंपली

21 Nov 2025 21:33:58
अमरावती,
municipal-elections जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व सत्ताधारी आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यशोमती या येत्या सहा महिन्यांत भाजपमध्ये दिसतील, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असा दावा आ. राणा यांनी केला तर यशोमती यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देत भाजपा उपयोग झाल्यानंतर आ. राणा यांना फेकून देईल, असा दावा केला आहे.
 

municipal-elections 
 
चिखलदर्‍यात दबावटाकून फोडाफोडी झाली, असा अरोप झाला होता. त्यावर आ. राणा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसला आपला पक्ष सांभाळता येत नाही. जे आमच्यासोबत आले ते लोकशाही मार्गाने आले असून त्यांना चिखलदर्‍याचा विकास हवा आहे. राहीला आमच्या ताई यशोमती ठाकूर यांचा प्रश्न तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवसा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. municipal-elections निवडणुकीपूर्वी त्यांनी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, असा दावा राणा यांनी केला आहे. तिवसा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळत असेल तर मी भाजपमध्ये यायला तयार आहे, असे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. पण, तेव्हा राजेश वानखडेंना तिकीट द्यायचे निश्चित झाले होते. म्हणून त्याचा भाजप प्रवेश झाला नाही, पण येत्या सहा महिन्यांमध्ये यशोमती ठाकूर या भाजपमध्ये दिसतील, असे वक्तव्य रवी राणा यांनी दिल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्यावर तत्काळ प्रत्युत्तर दिले.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, आमचे भाऊ रवी राणा यांना विनोद करण्याची सवय आहे. अफवा, गोंधळ, नाटक, नौटंकी सगळ्या गोष्टी करायची आवड त्यांना आहे. तुमचा पक्ष नेमका कोणता हे रवी राणांनी आधी ठरवले पाहिजे. आजची वस्तुस्थिती ही आहे की, भाजपाने त्यांचा पक्ष हा नवनीत राणा, रवी राणा यांच्या खुंट्याला बांधला आहे. आता उरला माझा विषय. मी इथेच जन्मली आणि इथेच मरणार आहे. सत्य काय आहे, ते लोकांना माहीत आहे. municipal-elections तुम्ही जी गुंडगिरी, दादागिरी करताहेत, हे लोकांना अजिबात आवडत नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा अमरावतीचा भाजप राणा दाम्पत्याच्या स्वाधीन केला आहे. रवी राणांनी म्हटले की, काळ्या दगडावरची पांढरी रेष. मी रवी राणांना म्हणते, पांढर्‍या दगडावरची काळी रेष अशी आहे की, जेव्हा तुमचा उपयोग संपून जाईल, तेव्हा भाजपा तुम्हालाच फेकून देणार आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0