नागपूर,
Ambedkar College डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ऑडिट सप्ताहाच्या उत्सवाचा भाग म्हणून भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयाद्वारे आयोजित क्विझ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि संस्थेचे नाव उंचावले. ज्यामध्ये क्विझ आणि निबंध स्पर्धांचा समावेश होता.
विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. वाणिज्य शाखेतील आदित्य तोटा, विज्ञान शाखेतील पार्थ थोटे आणि कला शाखेतील दिपाली राठोड, अक्षरा चुटे आणि संचिता चौखे यांनी खुल्या प्रश्नमंजुषा प्रकारात विविध बक्षिसे मिळविले. Ambedkar College त्यांनी आपले ज्ञान आणि स्पर्धात्मक क्षमता प्रभावीपणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, महाविद्यालयाचे व्यवस्थापन सदस्य, प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर, उपप्राचार्या हर्षा बोरकर, विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक कुणाल पाटील, कला आणि वाणिज्य विभागाचे प्रभारी विकास सिडाम व इतर शिक्षकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य: प्रफुल ब्राम्हणे, संपर्क मित्र