father-sexually-abused-daughter जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुकाअंतंर्गत येत असलेल्या डुग्गीपार पोलिस ठाणे हद्दीत बापानेच स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी बापाच्या विरोधात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी अंदाजे १० वर्षांपासून माहेरी राहत असून आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि आरोपीची आई राहत होते. मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याच निरागस विश्वासाचा फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला गोंदियातील महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. याप्रकरणी पीडित मुलीने ९ नोव्हेंबर रोजी डुग्गीपार पोलीस ठाणे गाठून आरोपी बापाच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. father-sexually-abused-daughter पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी बापाच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला १८ नोव्हेंबर रोजी अटक केली. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली. पुढील तपास डुग्गीपार पोलिस करीत आहेत