मुंबई,
ar-rahman-revealed-reason-for-converting लोकांना आपल्या गायिकीने आणि संगीताने मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय संगीतकार ए आर रहमान बॉलीवूडला अनेक हिट गाणी देत आले आहेत. फक्त भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. रहमानचा आवाज आणि त्याचे संगीत ऐकणे हे श्रोत्यांसाठी एक सांगीतिक पर्वणी असते. आधी त्याचे नाव दिलीप कुमार राजगोपालन होते, परंतु त्याने नंतर इस्लाम धर्म स्वीकारला.

नुकत्याच निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत रहमानने सुफीवादाचे महत्त्व आणि धर्माबद्दल आपले विचार व्यक्त केले. तो म्हणाला, “मी सर्व धर्मांचा चाहता आहे आणि इस्लाम, हिंदू व ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला आहे. माझी एकच अडचण आहे, ती म्हणजे धर्माच्या नावाखाली लोकांना मारणे किंवा इजा करणे. ar-rahman-revealed-reason-for-converting जेव्हा मी लोकांसमोर संगीत सादर करतो, तेव्हा मला ते एक तीर्थस्थान वाटते. विविध धर्म व भाषा असलेले लोक एकत्र येतात.” रहमान पुढे म्हणाला, “लोक वेगवेगळे धर्म पाळतात आणि भाषा बोलतात, तरी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत असते, तोपर्यंत ती व्यक्ती आपली इतर उद्दिष्टे साध्य करू शकते. आध्यात्मिक समृद्धी मिळाल्यासच भौतिक समृद्धीही मिळते.”
त्याने नसीर मुन्नी कबीर यांच्या पुस्तक ‘ए. आर. रहमान द स्पिरिट ऑफ म्युझिक’ मध्ये सांगितले, “कोणालाही सूफीवाद स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात नाही. जर हे तुमच्या हृदयातून आले, तरच तुम्ही त्याचे अनुसरण करता. माझ्या आईसोबत आम्हाला सूफी मार्ग सर्वोत्तम वाटला आणि म्हणूनच आम्ही इस्लाम स्वीकारला. आमचाभोवती कोणालाही धर्म परिवर्तनाची पर्वा नव्हती. आम्ही संगीतकार असल्यामुळे आम्हाला अधिक सामाजिक स्वातंत्र्य मिळाले.”