‘आशा’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

21 Nov 2025 13:25:40
मुंबई,
Asha Marathi movie, ‘बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाइनसह येणाऱ्या ‘आशा’ या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने आपली ताकद सिद्ध केली आहे. 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार पटकावत ‘आशा’ने समीक्षकांची प्रशंसा मिळवली आहे. चित्रपट येत्या 19 डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
 

Asha Marathi movie, 
महिलांच्या Asha Marathi movie, आयुष्याशी निगडित संघर्ष, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी यांचे प्रभावी चित्रण या कथेत करण्यात आले आहे. कथानकाच्या मध्यवर्ती भूमिकेत दिसणारी ‘आशा सेविका’ ही भूमिका रिंकू राजगुरूने साकारली आहे. केवळ आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी म्हणून नव्हे, तर प्रत्येक महिला आणि प्रत्येक कुटुंबासाठी आधार, मार्गदर्शक आणि निर्भय आवाज अशी आशाची भूमिका प्रेक्षकांना भिडणारी ठरणार आहे. तिच्या डोळ्यांतील संघर्ष, पावलांतली जबाबदारी आणि संकटांना तोंड देत न डगमगणारी ताकद या पात्राला अधिक ठळकपणे अधोरेखित करते.रिंकूसोबतच सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत. सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला अधिक वास्तववादी आणि भावस्पर्शी रुप मिळणार असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.या चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक दिपक पाटील म्हणाले, “‘आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाही, तर घर सांभाळत घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आहे. तिच्या स्वप्नांचा आणि जिद्दीचा आहे. मराठी प्रेक्षक सतत नवनवीन विषयांना दाद देतात, त्यामुळे ही वेगळी आणि अनोखी गोष्ट त्यांना नक्कीच भावेल.”
 
 
कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील यांच्या निर्मितीखाली, तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र अवटी यांच्या सहनिर्मितीमध्ये ‘आशा’ हा चित्रपट तयार झाला आहे. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना वास्तवाच्या जवळ जाणारी आणि कधीही न पाहिलेली दुनिया उलगडून दाखवण्याचे आश्वासन देतो.
चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर निर्माण झालेली उत्सुकता पाहता, ‘आशा’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी वर्षअखेरीस एक प्रभावी आणि भावनिक अनुभव ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0