जखमींना तातडीने प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले. पीडित कुटुंबीयांनी सर्व उपचाराचा खर्च वनविभागाने करावा, अशी विनंती केली आहे. लीस पाटील दिपाली सोमकुवर यांनी घटनेची माहिती वनविभाग व पोलीस स्टेशनला दिल्यानंतर, वनविभागाचे पथक गावात दाखल झाले आणि अस्वलाच्या शोधाची मोहीम सुरू केली. पायाचे ठसे सापडले तरी दोन तासांच्या शोधानंतर अस्वल दिसली नाही. गावकऱ्यांनी फटाके फोडून अस्वल पळवण्याचा प्रयत्न केला, पण या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर परिसरात वारंवार अस्वल आणि वाघांचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षा आणि संरक्षणाची मागणी जोर धरत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की वन्य हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे.