भाजपाच्या उमेदवाराची ९ मिनिटात माघार

21 Nov 2025 20:30:13
सिंदीरेल्वे, 
bjp-candidate-withdraws आज उमेदवारी मागे घेण्याची अंतीम तारीख होती. दुपारी भाजपाच्या बंडखोर उमेदवार अजया साखळे यांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता फत सहा महिलांमध्ये लढत रंगण्याची चिन्हं आहेत. येथे भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला नाट्यमयरित्या माघार घेण्यास भाग पाडले. दुपारी २ वाजून ५० मिनिटं ते २ वाजून ५९ मिनिटात झालेल्या घडामोडीत अर्ज मागे घेतल्या गेला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. त्यांनी ही मोहीम फत्ते केली.
  
 
bjp-candidate-withdraws
 
यंदा प्रथमच कॅडर बेस पक्ष समजल्या जाणार्‍या भाजपामध्ये बंडाळी झाल्याचे दिसून आले. दरम्यान बराच काथ्याकूट झाला. आज दुपारी भाजपाचे ओमप्रकाश राठी कार्यकर्त्यांसह साखळे यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांना पक्षाची भूमिका समजावण्यात आली. वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर अश्रूला वाट मोकळी करीत त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सहमती दर्शवली. अर्ज मागे घेण्यासाठीची जबाबदारी असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष गाते २ वाजून ५० मिनिटांनी सिंदीत पोहोचले. २ वाजून ५८ मिनिटांनी त्या नगर पालिकेत पोहोचल्या आणि २ वाजून ५९ मिनिटांनी त्यांनी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी पक्षाचे आदेश आणि संघटनेवर विश्वास ठेवत आपण उमेदवारी मागे घेत असल्याचे सांगितले. bjp-candidate-withdraws त्यांच्या या निर्णयाचे पक्षाने स्वागत केले. परिणामी, आता भाजपातर्फे राणी स्नेहल कलोडे आणि शरद पवार गटाकडून लढणार्‍या माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडे यांच्यात तीव्र संघर्ष होणार आहे. या दोघींशिवाय राकाँकडून नंदिनी भुते, उबाठाकडून रोशनी सचिन लांबट, शिवसेनाकडून नीलिमा तडस तर कांग्रेसकडून वनिता डफ यांचे नामांकन कायम आहे. येथे दहा प्रभाग असून २० जागांसाठी ९९ उमेदवारांची उमेदवारी कायम असल्याचे मुख्याधिकारी प्रणोती गावित यांनी जाहीर केले आहे.
Powered By Sangraha 9.0