निवडणूक प्रचारात भाजपाची आघाडी

21 Nov 2025 18:58:43
तभा वृत्तसेवा
वणी,
BJP election campaign Wani  नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात भाजपाकडून गृहभेटी व कॉर्नर सभांचा जोरदार धडाका सुरू आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्त्वात नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार तसेच नप अध्यक्षपदाचे उमेदवार विविध भागात जनतेशी थेट संवाद साधत आहेत.मंगळवारी, 18 नोव्हेंबरला सकाळी जैताई मंदिरात दर्शन घेऊन गृहभेट व जनसंवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. बुधवारी जैन लेआऊटसह प्रभाग 2 व प्रभाग 9 मधील काही भागात प्रचार कॉर्नर मिटिंग घेण्यात आली. या प्रचारात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले.
 

BJP election campaign Wani  
जैन लेआऊट येथील बैठकीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या परिसरातील विकास कामांचे तपशीलवार विश्लेषण केले. त्यांनी गेल्या काही वर्षांत प्रभागात झालेली रस्ते सुधारणा, नाली बांधकामे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्ट्रीट लाइट, सार्वजनिक सोयीसुविधांचा उल्लेख केला. यासोबतच येथील प्रलंबित प्रश्नांवरही मतदारांसमोर स्पष्ट भूमिका मांडली.
आगामी काळात या भागासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार आहेत, कोणती कामे प्राधान्याने केली जातील आणि कोणत्या योजना राबवून सर्वांगीण विकास साधला जाईल, याची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. बैठकीदरम्यान उपस्थित शेकडो मतदारांनी बोदकुरवार यांना प्रश्न विचारत आपले मुद्दे मांडले आणि या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वणीकरांनी मागील निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत दिल्याने वणी शहरात रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. यावेळी पुन्हा विश्वास ठेवून निवडून द्या राहिलेले सर्व कामे आम्ही निश्चित पूर्ण करू, असे आश्वासन संजीवरेड्डी बोदकुरवार मतदारांना देत आहेत.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अ‍ॅड. नीलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, अंकुश बोढे यांच्यासह नप अध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच सर्व प्रभागातील 29 उमेदवार व भाजपा कार्यकर्ते प्रचारात अग्रेसर आहेत.
 
 
नप अध्यक्ष पदासाठी 12 तर नगरसेवकांसाठी 120 उमेदवार
 
 
नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 22 जागेसाठी येत्या 2 डिसेंबरला होऊ घातली आहे.या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकुण 21 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले. तर नगरसेवकांसाठी एकूण 165 उमेदवारांने उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले होते.
 
18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये छाणणीत नगराध्यक्ष पदासाठी 21 पैकी 8 बाद झाल्याने 13 उमेदवार रिंगणात उभे होते. तर नगरसेवकांसाठी 165 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्यापैकी 36 अर्ज छाणणीत नामंजूर झाले. त्यामुळे नगरसेवकांसाठी 129 उमेदवार रिंगणात उभे आहेत. शुक्रवार,21 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. नप अध्यक्ष पदासाठी 13 उमेदवारांपैकी एका उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगरसेवकांसाठी 129 पैकी 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 120 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आर्णी नप निवडणूक निर्णय अधिकारी वैशाख वाहुरवाघ तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राऊत यांनी ही माहिती दिली.
 
 
132 नगरसेवक, 5 नप अध्यक्ष रिंगणात
उमरखेड : नगरपरिषद निवडणुकीसाठी शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अंतिम छानणीनंतर नगरसेवक पदासाठी 23 उमेदवारांनी तर नप अध्यक्ष पदासाठी 5 उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 13 प्रभागातील 26 वॉर्डासाठी एकूण 132 नगरसेवक उमेदवार आणि नगर परिषद अध्यक्ष पदासाठी 5 उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्या देखरेखीखाली पार पडले.
Powered By Sangraha 9.0