सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नप भाजपाच्या हातात द्या..!

21 Nov 2025 18:48:12
तभा वृत्तसेवा
पुसद,
Chandrashekhar Bawankule केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येत्या निवडणुकीत कमळाचे बटण दाबून पुसद नगर पालिका भाजपाच्या हातात द्या, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री तथा राज्याचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 

Chandrashekhar Bawankule 
अग्रवाल Chandrashekhar Bawankule  मंगल कार्यालयाच्या सभागृहात पुसद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुसद शहर व तालुका भाजपातर्फे नप अध्यक्ष व नप सदस्यपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, माजी आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, माजी जिप उपाध्यक्ष ययाती नाईक, विनोद जिल्हेवार, महेंद्र मस्के, मिलिंद उदेपूरकर, महेश नाईक, नप अध्यक्षपदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार, अनिरुद्ध चोंढीकर, योगेश राजे, नीलेश पेंशनवार, रवी ग्यानचंदानी, धनंजय अत्रे उपस्थित होते.याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, पुसद शहराच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने भरपूर निधी दिला असून शहरातील सर्व लेआऊटमधील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देत पुसद नगर परिषदेत अध्यक्षांसह सर्व सदस्य पदाच्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती बावनकुळे यांनी केली.
प्रास्ताविक अ‍ॅड. नीलय नाईक यांनी तर संचालन ओमप्रकाश शिंदे यांनी केले. यावेळी भाजपाचे सर्व उमेदवार, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0