वर्धा,
municipal-general-election वर्धा जिल्ह्यात ६ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापून आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत असल्याने या पक्षाकडे नगराध्यक्ष व सदस्यासाठी उमेदवारी मागण्याची लांबलचक यादी होती. तिकीट वाटपात नेत्यांना डोकेदुखी झाली होती. ज्यांना तिकिटा मिळाल्या नाहीत त्यांनी अध्यक्षपदाकरिता अपक्ष उमेदावारी दाखल केले होती. भाजपाला त्यांची उमेदवारी मागे घेण्यात १०० टके यश आल्याने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी टेंशनमुत झाली आहे. मात्र, अंतर्गत कलहात असलेल्या महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम आहे. आज २१ रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतले. यात अध्यक्षपदासाठीच्या ८ तर सदस्यपदासाठीच्या ४२ उमेवारांचा समावेश आहे.

वर्धा नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात गुरूवार २० रोजीपर्यंत १२ उमेदवार कायम होते. municipal-general-election आज शुक्रवारी ४ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यात शरद पवार गटाचे शैलेेंद्र झाडे, अपक्ष प्रशांत बुर्ले, बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार शेख हबीबुर्रहमान रफिक अहमद तर अपक्ष शाबीर मुस्तपा तुरक यांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठीच्या रिंगणात ८ उमेदवार कायम आहेत तर शुक्रवारी सदस्यपदासाठीच्या १६ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे सध्या नगरसेवक पदासाठी १९१ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहे. तर अपिलासाठी जे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयाची पायरी चढले त्या प्रकरणात वर्धा नगरपालिकच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांनी आपला अभिप्राय शुक्रवारी न्यायालयात सादर केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गणेश खताळे यांनी सांगितले.
वर्धेतील नगराध्यपदाचे उमेदवार
नीलेश किटे, सुधीर पांगुळ, रविकांत बालपांडे, संतोष ठाकूर, स्कर्मिश खडसे, नितीन जुमडे, प्रमोद भोमले, सुनील शामडीवाल
आर्वी नप
स्वाती गुल्हाणे, शुभांगी कलोडे, अंजली जगताप, भावना दारुंडे, दीपाली देशमुख, अमरिन परवीनदिन मोहम्मद
सिंदी (रे.) नप
राणी कलोडे, सुनीता कलोडे, निलीमा तडस, नंदिनी भुते, रोशनी लांबट, वनिता डफ
हिंगणघाट नप
नयना तुळसकर, निता धोबे, शुभांगी डोंगरे, उज्वला भगत, हिरा परवीन बिसमिल्ला खान, धनर्षी क्षीरसागर, बबिता वाघमारे, पायल धोटे, मीना सोनटक्के, योगिता घुसे
देवळी नप
शोभा तडस, मनोज गंभीर, किरण ठाकरे, उमेश मसराम, सुरेश वैद्य
पुलगाव नप
ममता बडगे, कविता ब्राम्हणकर, संगीता रामटेके, प्रतीभा वाघमारे, रंजिता साहू, रिता थेटीवार, योगिनी भुसारी, स्वाती कुचे