कटिहार,
husband-kills-wife बिहारच्या कटिहार जिल्यातील नारायणपूर गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “तू तर काळा आहेस, मग तुझा मुलगा गोरा कसा?”— अशा टोमण्यांनी पतीने संशयाच्या भरात पत्नीचे गळा चिरून खून केला. यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी पती फरार असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आजमनगरमधील जलकी गावात राहणाऱ्या सुकुमार दास याला तीन महिन्यांपूर्वी दुसरा मुलगा झाला होता. पहिला मुलगा आणि सुकुमार स्वतः गोरे नव्हते. husband-kills-wife मात्र दुसरा मुलगा गोरा जन्मल्याने सुकुमारला पत्नी मौसमी दास हिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला. त्यातच मित्र व शेजाऱ्यांनी “तू काळा, मग तुझा मुलगा इतका गोरा कसा?” असे हिणवून त्याच्या मनातील शंका आणखी दृढ केली. या प्रकरणावरून दाम्पत्यात सतत भांडण सुरू झाले. मौसमी कितीही सांगत होती की मूल सुकुमारचंच आहे, तरीही त्याचा संशय काही दूर होत नव्हता. अखेर सततच्या वादामुळे मौसमी आपल्या वडिलांच्या नारायणपूर येथील घरी राहायला आली.
बुधवारी सुकुमार सासुरवाडीत आला, जिथे कुटुंबीयांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. रात्री सर्वजण जेवण करून झोपले. मात्र, रात्रीच सुकुमारने मौसमीचा गळा चिरून हत्या केली आणि तिच्या खासगी भागांवरही वार करून घटनास्थळावरून फरार झाला. सकाळी मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने कुटुंबीयांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा ते थरारून गेले— मौसमी रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेली होती, तर पती पळून गेला होता. husband-kills-wife तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून, सासऱ्यांच्या तक्रारीवरून आरोपी सुकुमारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाव्य ठिकाणांवर छापे टाकून त्याचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.