देवळी,
deoli-municipal-council देवळी नगरपरिषदेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी अध्यक्षपदाचा १ तर सदस्यपदाच्या एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे ५ तर सदस्यपदासाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे १० प्रभागातून २० उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

अध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीत अपात्र ठरले तर एकाने स्वच्छेने माघार घेतल्याने आता ५ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. सदस्य पदासाठी ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन अर्ज अपात्र एक अर्ज परत घेण्यात आला तर चार अर्ज रिपीट असल्याने ७० उमेदवार या निवडणुकीत उतरले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, देवळी जनशती आघाडी, बहुजन समाज पार्टी तसेच अपक्ष उमेदवार जोरदार तयारीत असून प्रभागनिहाय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता प्रचार मोहीमा सुरू झाल्या आहेत. सभांचा तडाखा, कॉर्नर सभा, दारोदारी संपर्क अभियान यामुळे राजकीय वातावरणात चुरस वाढली. deoli-municipal-council मतदार कोणाकडे कल दाखवणार हे पाहणे औत्सुयाचे ठरणार आहे. देवळी नगरपरिषद सत्तेची किल्ली कोणाकडे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.