तभा वृत्तसेवा उमरखेड,
Malegaon Dongarale incident मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षीय निरागस चिमुकलीवर बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करणाèया हैवानी प्रवृत्तीचा खैरनार यास जलदगती न्यायालयात शिघ्र खटला चालवून विनाविलंब कठोरात कठोर शिक्षा करा. अशा राक्षसी प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करून संत नरहरी महाराज सुवर्णकार संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाèयांमार्फत निवेदन देण्यात आले.
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षीय निरागस बालिकेवर विजय खैरनार या राक्षसी मनोवृत्तीच्या विकृत प्रवृत्तीने अमानवी कृत्य करून तिच्या तोंडावर दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली.या घटनेमुळे समाजमन सुन्न होऊन भयभित झाले आहे. अशा प्रवृत्तींचा समाजातून कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी शासनाने जलदगती न्यायालयात खटला चालवून शिघ्रतेने कठोरात कठोर शिक्षा करावी, शासनाने या अमानवीय घटनेची गंभीर दखल न घेतल्यास संतापाचा उद्रेक होऊन राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
यावेळी संत नरहरी महाराज सुवर्णकार समाज संघटनेचे अध्यक्ष सुनील टाक, सचिव राम बोकन, कोषाध्यक्ष कैलास उदावंत, सतीश श्रीरामजवार, सुनील उदावंत, देवीदास शहाणे, अतुल मैड, अतुल उदावंत, नितीन शहाणे, वैभव उदावंत, सावन टाक, अतुल पत्तेवार, शंकर काळे, तुषार कदम, यश उदावंत, गजानन नाशिककर, प्रसाद महामुने, संजय डहाळे, दीपक वाकडे, दिलीप शहाणे, निळकंठ धोबे, सूरज कुलथे, अनिल नाशिककर यांच्यासह सुवर्णकार समाजबांधव उपस्थित होते.