ऐतिहासिक! चीनचे अद्भुत तरंगते कृत्रिम बेट

21 Nov 2025 13:47:27
बीजिंग,
China floating artificial island समुद्रातील तंत्रज्ञान आणि सामरिक शक्ती वाढवण्याच्या दिशेने चीनने आणखी एक धाडसी पाऊल उचलले आहे. चीन जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट विकसित करत असून, 78 हजार टन वजनाचे हे बेट आवश्यकतेनुसार समुद्रात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणार आहे. अत्यंत मजबूत बनवलेल्या या संरचनेची क्षमता इतकी प्रचंड आहे की ती अणुस्फोटालाही तोंड देऊ शकते. आकारमानाच्या दृष्टीने हे बेट चीनच्या नवीन फुजियान विमानवाहू नौकेइतके मोठे असेल.
 

China floating artificial island 
या तरंगत्या प्लॅटफॉर्मवर 238 जण सलग चार महिने कोणत्याही बाह्य पुरवठ्याशिवाय राहू शकतील. चार महिन्यांची ही स्वयंपूर्ण क्षमता जगातील अनेक अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू नौकांपेक्षा अधिक आहे. Deep-Sea All-Weather Resident Floating Research Facility असे या प्रकल्पाचे नाव असून, चीनच्या 14व्या पंचवार्षिक योजनेतील राष्ट्रीय वैज्ञानिक उपक्रमांमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे डिझाइन शांघाय जिओटोंग विद्यापीठ आणि चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन संयुक्तपणे तयार करत आहेत. 2028 मध्ये हे प्लॅटफॉर्म समुद्रात उतरवण्याची तयारी आहे.
 
 
 
 
अणुस्फोटापासून संरक्षणाची गरज का?
 
या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांनी सांगितले की हे कृत्रिम बेट वर्षभर कोणत्याही हवामानात समुद्रात राहण्यासाठी तयार केले जात आहे. यामध्ये पावर सिस्टम, नेव्हिगेशन, कम्युनिकेशनसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सुविधा असल्याने त्यांचे अणुस्फोटाच्या झटक्यांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.हे तरंगते प्लॅटफॉर्म 138 मीटर लांब आणि 85 मीटर रुंद असेल. मुख्य डेक समुद्रसपाटीपासून 45 मीटर उंचीवर असेल. ट्विन-हुल डिझाइनमुळे ते 69 मीटर उंच लाटांमध्येही स्थिर राहू शकते. हे प्लॅटफॉर्म 15 नॉट्सच्या वेगाने पुढे जाऊ शकते आणि कॅटेगरी 17 पर्यंतच्या तीव्र वादळांनाही सामना करू शकते.
 
 
अणुस्फोटापासून संरक्षण देणारे नवे मेटामटेरियल
सामान्यतः अणुस्फोटापासून China floating artificial island बचावासाठी जाड स्टील प्लेट्स वापरल्या जातात. परंतु या प्लॅटफॉर्मचे वजन कमी ठेवणे आवश्यक असल्याने वैज्ञानिकांनी नवीन पद्धत अवलंबली. त्यांनी सूक्ष्म मेटल ट्यूब्सनी तयार केलेल्या सॅंडविच बल्खेडची रचना विकसित केली. हा विशेष मेटामटेरियल धमाक्याचा तीव्र दाब कमी करून नियंत्रित दबावामध्ये परिवर्तित करतो.60 मिलीमीटर जाडीचा हा पॅनेल पारंपरिक जाड स्टील कवचापेक्षा अधिक मजबूत असल्याचे चाचण्यांमध्ये सिद्ध झाले. 177 किलोपास्कलच्या प्रचंड स्फोटाला तोंड दिल्यानंतरही संरचना सुरक्षित राहिली. चाचण्यांमध्ये धक्क्याची मात्रा 58% ने कमी झाली आणि संरचनावरील ताण 14% ने घटल्याचे आढळले.अधिकृतरित्या या प्लॅटफॉर्मला वैज्ञानिक संशोधन केंद्र असे संबोधले जात असले तरी त्याच्या बांधकामामध्ये चीनच्या सैनिकी अणुसुरक्षा मानकांचा वापर करण्यात आला आहे. त्यावरून हे प्लॅटफॉर्म नागरी आणि लष्करी दोन्ही उपयोगासाठी तयार केले जात असल्याचे स्पष्ट होते. दक्षिण चीन समुद्रासारख्या विवादित भागांत ते नियंत्रण केंद्र, देखरेख केंद्र किंवा लॉजिस्टिक हब म्हणूनही तैनात केले जाऊ शकते.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे समुद्रातील चीनची तांत्रिक आणि सामरिक क्षमता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0