कंत्राटदारांची पाठ:१५ पैकी केवळ २ वाळूघाटांचा ई-लिलाव
21 Nov 2025 21:49:56
अकोला,
sand-pits-e-auctioned जिल्हा खनिकर्म विभागाच्या वतीने १५ वाळू घाटांच्या ई-लिलावाची प्रक्रिया २० नोव्हेंबर रोजी पार पडली. या प्रक्रियेत केवळ दोन घाटांचा लिलाव झाला असून त्यापोटी ५१ लाख ७६ हजार ४२८ रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे.उर्वरित ३६ वाळू घाटांचा दुबार लिलाव हा ४ डिसेंबर रोजी होणार असून २८ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असणार आहे.
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यात वाळू घाटाच्या लिलावाचा गोंधळ सुरू आहे मध्यंतरी राज्य सरकारने वाळू डेपो ही संकल्पना रूढ केली. मात्र जिल्ह्यात त्याला फाररसा प्रतिसाद मिळाला नाही. sand-pits-e-auctioned परिणामी अवैध वाळू माफीयांना रस्ता खुला झाला व शासनाच्या महसुलाला चूना लागला.दरम्यान यंदा या प्रक्रियेत बदल झाला असून पूर्वीप्रमाणेच पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेल्या वाळू घाट ई लिलाव पद्धतीने प्रक्रिया सुरुवात झाली.पंधरा वाळू घाटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.आता उर्वरित ३६ वाळू घाटांचा पुन्हा दुबार लिलाव होणार आहे.कपिलेश्वर, एकलारा, कट्यार, म्हैसांग, उगवा, केळीवेळी, पिलकवाडी, निंबा, बहादुरा, सागद, नागद, डोंगरगाव, मांजरी या वाळू घाटासाठी एकानेही लिलाव प्रक्रियेत भाग घेतला नाही.