दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे क्रिकेट सामना आता मुंबई!

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Cricket match now in Mumbai due to pollution दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे क्रिकेट वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. राजधानीतील हवेमुळे खुल्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे धोकादायक ठरत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्लीत होणाऱ्या अंडर-२३ एकदिवसीय स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांचे ठिकाण बदलले आहे. आता हे सामने दिल्लीऐवजी मुंबईत खेळवले जातील.
 
 
Cricket match now in Mumbai due to pollution
 
दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यापासून एअर क्वालिटी इंडेक्स ३५० ते ४०० दरम्यान असल्याचे आढळले आहे, जे 'अत्यंत खराब' आणि 'गंभीर' श्रेणीत येते. खेळाडूंच्या आरोग्याचा विचार करता खुल्या हवेत सामना करणे धोकादायक ठरले असल्याने बीसीसीआयने मुंबईची निवड केली आहे, जिथे हवामान आणि हवेची गुणवत्ता सध्या चांगली आहे.
 
ग्रुप स्टेजची अंतिम फेरी २१ नोव्हेंबर रोजी संपणार असून त्यानंतर बाद फेरीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाईल. तथापि, बोर्डाने आधीच मुंबईत तयारी सुरू करण्यास सूचना दिली आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे हा पहिला बदल नाही. याआधी भारत-विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचा पहिला सामना १४ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये होणार होता, परंतु प्रदूषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सामना कोलकाता येथे हलवला गेला होता. सतत धोकादायक AQI पातळीमुळे केवळ सामान्य जीवनावरच नाही तर खेळाडूंच्या तंदुरुस्ती आणि कामगिरीवरही धोका निर्माण होतो, त्यामुळे बोर्डाने सावधगिरी बाळगून हा निर्णय घेतला आहे.