दारव्हा,
Municipal Council Elections : 20 नोव्हेंबरला दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामध्ये प्रभाग क्र 7 (ब) उमेदवार मनाली गौतम मुथा प्रभाग 8 (ब) मधून निमकर वैभव जिनेंद्र यांनी माघार घेतली. 21 नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याचा शेवटल्या दिवशी नगराध्यक्ष पदामधून काजी अमीरोद्दिन काजी आरोफोद्दिन, सुरेश भाऊराव निमकर, आशिष विश्वंभर वानखडे यांनी माघार घेतली तर उमेदवारात जावेद शे. इमाम शाहरुखखान, वहिदुल्ला खान, अशोक वासुदेव जयसिंगपुरे, राऊत सचिन बबनराव, जाधव लीला उत्तमराव, मोनल दशरथ राठोड, मिरा शिवदास कराळे, माधुरी सचिन जाधव, धनंजय बबन इरवे, वंदना अमोल वानखडे, काजी अमिरोद्दिन काजी आरीफोद्दीन, सोमी अहमदखान बशीद महमदखान यांनी माघार घेतली, अशी माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली.