तभा वृत्तसेवा पांढरकवडा,
Giriraj Kale weightlifting राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात झालेल्या इंटर कॉलेज वेटलिफ्टिंग स्पर्धेत पांढरकवडा येथील गिरीराज श्रीकांत काळे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
त्याच्या दमदार Giriraj Kale weightlifting प्रदर्शनामुळे स्पर्धेत उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. गिरीराज पांढरकवडा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्रीकांत काळे यांचा मुलगा असून तो मागील 4 वर्षांपासून नागपूर येथे शिक्षणासोबत बॉडी बिल्डिंगचा सराव करीत आहे. विशेष करून तो पूर्णत: शाकाहारी आहेत. गिरीराजच्या या उल्लेखनीय यशाबद्दल स्थानिक पातळीवरून व महाविद्यालयामार्फत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेहनत, शिस्त व सातत्य यांच्या जोरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.