गुजराती सिनेमाचा नवा इतिहास

21 Nov 2025 12:28:16
मुंबई,
Gujarati film Lalo Krishna Sada Sahayte उत्कृष्ट कथानक, दमदार अभिनय आणि सुबक दिग्दर्शन यांचा मेळ साधला की चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाची उंच भरारी घेतो. मराठीतील ‘सैराट’ने हे सिद्ध केले होतेच. आता असेच यश एका गुजराती चित्रपटालाही लाभले आहे. ‘लालो कृष्ण सदा सहायते’ या चित्रपटाने संपूर्ण गुजराती फिल्म इंडस्ट्रीला अभूतपूर्व उंचीवर पोहोचवले असून, आता हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांनाही मोहित करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा डब केलेला हिंदी व्हर्जन प्रदर्शित होणार आहे.
 
 

Gujarati film Lalo Krishna Sada Sahayte 
गुजराती भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याच्या भावनिक आणि अध्यात्मिक कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १० ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाची सुरुवातीची कमाई धीमी होती. मात्र तिसऱ्या आठवड्यापासून माऊथ पब्लिसिटीने जादू दाखवली आणि चौथ्या आठवड्यात चित्रपट सुपरहिट ठरला. थिएटर्समध्ये वाढत गेलेली गर्दी आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता हा चित्रपट लवकरच चर्चेचा विषय बनला.
 
 
या चित्रपटाच्या Gujarati film Lalo Krishna Sada Sahayte लोकप्रियतेचा अंदाज या गोष्टीवरून लावता येतो की, हा पहिला असा गुजराती चित्रपट ठरला ज्याने एका दिवसात तब्बल ५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. प्रादेशिक सिनेमासाठी ही अभूतपूर्व बाब मानली जाते. आतापर्यंत या चित्रपटाने ७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून लवकरच कमाई १०० कोटींच्या घरात पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती केवळ ५० लाख रुपयांच्या अल्प बजेटमध्ये करण्यात आली. दिग्दर्शक अंकित सकिया यांनी कमी साधनसामग्रीत उत्तम निर्मितीमूल्यांची सांगड घालत प्रेक्षकांना भावणारा चित्रपट तयार केला. रीवा रच्छ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी, अन्शु जोशी आणि किन्नल नायक यांच्या भूमिकांनाही विशेष दाद मिळत आहे.
 
 
सध्या निर्माते चित्रपटाच्या हिंदी डबिंगच्या अंतिम टप्प्यावर काम करत असून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तो देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लालो कृष्ण सदा सहायते’ने निर्माण केलेला हा विक्रमी प्रवास आगामी दिवसांत हिंदी प्रेक्षकांसमोर किती यशस्वी ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0