पती कुणासोबतही झोपायला सांगायचा; संतापलेल्या पत्नीने केल अस की..

21 Nov 2025 21:20:14
फतेहपुर,  
wife-killed-husband-in-fatehpur देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, उत्तर प्रदेशातील फतेहपुर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरपुर गावातील एका महिलेवर तिच्या पतीने अनेक वर्षे सतत छळ केला. तो दारूचा व्यसनी असून नशेत पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. शिवाय पैशांसाठी पत्नीवर दुसऱ्या पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकायचा. या सततच्या छळाला कंटाळून पत्नी आणि तिच्या १७ वर्षीय मुलाने रात्रभर योजना आखली.
 
 
wife-killed-husband-in-fatehpur
 
१७ नोव्हेंबरच्या रात्री राजमल आपल्या मोठ्या भावाच्या घरी ढोल-पूजन करून परतत होता. त्याचवेळी पत्नी आणि मुलगा त्याच्या मागे निघाले. निर्जन ठिकाणी पोहोचल्यावर दोघांनी त्याला ढकलून पाडले. मुलाने त्याचे हात पकडले, तर पत्नीने त्याचा गळा दाबून हत्या केली. एसपी अर्पित विजयवर्गीय यांच्या मते, चौकशीत पत्नीने गुन्हा कबूल केला आहे. wife-killed-husband-in-fatehpur दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. हत्येनंतर राजमलचा मृतदेह रस्त्याच्या शेजारी टाकण्यात आला, तर आरोपी दोघेही परत घरात गेले. गावकऱ्यांनी मृतदेह पाहून पोलिसांना कळवले. चौकशीत पत्नीने पतीच्या वाईट वर्तनाची माहिती दिली आणि त्याच्या कृत्यांविषयी धक्कादायक खुलासे केले. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि सततच्या छळाची ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
Powered By Sangraha 9.0