दोहा,
IND vs BAN : भारताला बांगलादेशविरुद्ध आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला.
सामना सुरुवातीपासूनच रंगतदार होता; भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूत तीन धावा लागल्या, हर्ष दुबे आणि नेहाल वधेराने धाव घेतल्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला. भारताच्या संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या आणि नेहाल वधेरा फलंदाजीसाठी तयार होते, पण भारताचा कर्णधार जितेश शर्मा पहिल्याच चेंडूवर स्ट्राइक घेऊन स्कुप फटका मारण्याचा प्रयत्न करत क्लीन बोल्ड झाला. या एका चुकीमुळे भारताची सुपर ओव्हर संधी गमावली आणि अखेरीस संघाला पराभव पत्करावा लागला. हिरो बनायला आलेला जितेश शर्माच या सामन्यात पराभवाचा व्हिलन ठरला, ज्यामुळे भारतीय संघाला अंतिम फेरीत जाण्याचा मार्ग बंद झाला.