अबब... राज्यात रस्ते अपघातात 12 हजारांवर नागरिकांचा बळी

21 Nov 2025 14:37:28
अनिल कांबळे

नाेव्हेंबर,
Nagpur road accidents राज्यातील अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट हाेण्याऐवजी वाढ हाेताना दिसत असून गेल्या दहा महिन्यांत राज्यात 12 हजार 766 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये समृद्धी आणि अन्य महामार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याने राज्यातील रस्ते सुरक्षेची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे.
 

Nagpur road accidents 
 
 
रस्ते अपघातावर Nagpur road accidents नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहनांची वाढती गती आणि मानवी चुकांमुळे राज्यात अपघात कमी हाेण्याऐवजी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. राज्यातील अपघातांमध्ये सर्वाधिक घटना मुंबई आणि नागपुरात नाेंदविण्यात आल्या आहेत. दैनंदिन वाहतुकीचा ताण, वाढती वाहनसंख्या आणि अनियंत्रित वाहतूक यामुळे 2025 मधील अपघातांचे प्रमाण 2024 च्या तुलनेत अधिक असल्याचे दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय काेलारकर यांना प्राप्त माहितीनुसार, नागपुरात गेल्या दहा महिन्यांमध्ये 987 रस्ते अपघातात 235 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत याच कालावधीत तब्बल 1910 अपघात झाले असून, त्यात 274 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील
ग्रामीण भागातील रस्त्यांची धाेकादायक स्थिती, वेगमर्यादांचे उल्लंघन आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे अपघातात माेठी वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात 806 रस्ते अपघातात 370 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये रस्ते अपघातात एकूण 764 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्थेची उणीव पुन्हा अधाेरेखित झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर महामार्गावर अपघातांचे प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटेलिजेंट ट्रॅिफक मॅनेजमेंट सिस्टीमची उभारणी करण्यात आली. वेग नियंत्रक उपाययाेजना आणि तात्काळ कारवाईमुळे या महामार्गावरील अपघातात काही प्रमाणात घट झाल्याचा दावा पाेलिस विभागाने केला आहे.
 
 

नागपूर जिल्ह्यात सर्वाधित बळी
 
 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यावर सर्वाधिक बळी गेले आहेत. विदर्भातील आकडेवारी लक्षात घेता नागपूर ग्रामीण परिसरात 806 अपघातात सर्वाधिक 370 बळी रस्ते अपघातात गेले आहेत. त्यापाठाेपाठ यवतमाळमध्ये 750 अपघातात 356 बळी गेले आहेत. अमरावती ग्रामीणमध्ये 237 तर अमरावती शहरात 61 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अकाेल्यात 372 अपघातात 157 जण ठार झाले आहेत. अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ चिंताजनक आहे.
 
 

महामार्गांवरील वाहतूक ठरताेय धाेकादायक
राष्ट्रीय महामार्गावरील सुसाट वाहतूक आणि मानवी चुकांमुळे अपघात वाढले आहेत. समृद्धी एक्स्प्रेस हायवेवर 154 अपघातात 128 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग 53 आणि 54 यावर 1076 रस्ते अपघातात 574 जण ठार झाले आहेत. रस्ते अपघातात सर्वाधिक दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे. तसेच सर्वाधिक अपघात ट्रक आणि त्यापेक्षा माेठ्या वाहनांकडून झाले आहेत. जानेवारी ते ऑक्टाबर 2025 या कालावधीत राज्यात 12 हजार 776 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 11 हजार 146 पुरुष तर 1620 महिलांचा समावेश आहे.
 
 
 
महामार्गांवरील अपघातांची प्रमुख कारणे
- दीर्घ प्रवासामुळे चालकांना येणारा थकवा
- अतिवेगाने वाहन चालविणे (ओव्हरस्पीडिंग)
- रात्रीच्या वेळेस झाेपेचा झटका आणि लक्ष विचलित हाेणे
- काही ठिकाणी ’रिफफ्लेक्टर’ आणि ’डिव्हायडर’ यांची दृश्यमानता कमी असणे
- वाहन चालविताना ओव्हरटेक करताना अतिआत्मविश्वास दाखवणे
- वाहन चालवताना दृष्टीभास हाेणे
Powered By Sangraha 9.0