भूमाफिया विराेधी विशेष पथकाचा दणका

21 Nov 2025 14:24:22
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur anti-land mafia squad नागपुरात शेतजमीन, भूखंड, फफ्लॅट बळकविणाèया भूमािफयाच्या टाेळ्या निर्माण झाल्या आहेत. भूमािफयांचा बंदाेबस्त करण्यासाठी पाेलिस आयुक्तांनी भुमािफया विराेधी विशेष पथकाची स्थापना केली हाेती. या पथकाने पाच विविध प्रकरणांत भूमािफयांना दणका देत गुन्हा दाखल केला आहे. आणखी काही भूमािफयांवरदेखील कारवाई हाेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
 
 

Nagpur anti-land mafia squad 
पाेलिस आयुक्त डाॅ.रविंद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेअंतर्गत भूमािफया विराेधी पथकाची स्थापना केली हाेती. यात शेती, प्लाॅट, फफ्लॅटचे मालकी हक्कांबाबतचे वाद, अवैधरित्या शेतजमिन, प्लाॅट, फफ्लॅट संबंधाने बनावट दस्तऐवजाद्वारे विकी करणे, अवैध कब्जा करणे, अतिक्रमण करणे तसेच एकच मलमत्ता अनेकांना विक्री करणे, भू-मािफया यांचे कडुन धमकी मिळणे अशा प्रकारचे अर्जाचा निपटारा करण्यावर भर देण्यात येत आहे. पिडीतांच्या अर्जांची चाैकशी करून भूमािफयांविराेधात गुन्हे दाखल करण्यात येत आहे. त्यानुसार पाेलीस निरीक्षक रविंद्र नाईकवाडे यांनी पाच गुन्हे दाखल केले.
 
 
बनावट महिला उभी करून 80 लाखांचा गंडा
 
हितेश रघुवीरशरण अग्रवाल (42, नेहरू काॅलनी, अनंतनगर) याने सविता उजवणे (महाल) यांच्या माैजा बेसा येथील मालकीच्या जागेची परस्पर विक्री केली हाेती. त्याने सविता यांच्या जागेवर बनावट महिला उभी करून तसेच बनावट आधार कार्डाचा वापर करून नाेंदणीखत तयार केले व त्यांच्या दाेन प्लाॅटची 80 लाखांना विक्री केली. या प्रकरणात काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

शेतजमिनीची 3.80 काेटींना विक्री
काेतवाली पाेलीस ठाण्यातच आराेपी गणेश गंगाराम धांडे (61, आदर्शन गर, दिघाेरी) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप नामदेवराव तुपकर (हिवरीनगर) यांच्या मालकीचे माैजा चाेरबाहुली (माेगरा) येथे शेत हाेते. धांडेने बनावट आममुखत्यार पत्राचा अभिलेख तयार करून त्यावर तुपकर यांचा बनावट ाेटाे व स्वाक्षरी करून 19 एकर जमिनीची 3.80 काेटींना विक्री केली.
 
 
काटाेलमध्ये भलत्याच्याच शेतजमिनीवर ले आऊट
 
 
सुहास लाऊने (दही बाजार पूल, झाडे चाैक) व रचना नीळकंठ गजभिये (34, अंगुलीमाल नगर, नारी मार्ग) यांनी काटाेलमधील म्हसखापरा येथे तसेच राहुळगाव येथील भलत्याच व्यक्तीच्या शेतजमिनीवर ले आऊट टाकले. त्यानंतर त्यांनी रामकृपाल काेरेलाल यादव तसेच आणखी चार जणांकडून 6.40 लाख घेऊन करारनामा केला. या प्रकरणात आराेपींविराेधात शांतीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
एकाच भूखंडांचे दाेघांना विक्रीपत्र
राधानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेचा अध्यक्ष अविनाश शरदचंद्र खडके (नक्षी मार्ग, भिवापूर) याने माैजा मानेवाडा येथील लेआऊटमधील भूखंड सहदेव हरगाेविंद घिया (70, कर्नलबाग) यांना विकला हाेता. मात्र याची माहिती असूनदेखील खडकेने ताे भूखंड लाेकेश गणपतराव चाैधरी यांनादेखील विकला व घिया यांची 30 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणात हुडकेश्वर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे घेऊन घराची विक्री नाही
आराेपी धीरज Nagpur anti-land mafia squad राजपूत (आशीर्वादनगर) याने देवयानी सुरजसे (वरूड, अमरावती) यांच्याकडून घर विक्रीच्या नावाखाली 8.71 लाख रुपये धनादेशाच्या माध्यमातून घेतले. मात्र त्याने कुठलीही रजिस्ट्री करून दिली नाही. त्याच्याविराेधात सक्करदरा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0