गाेमांस-चामड्याच्या गाेदामावर पाेलिसांचा छापा

21 Nov 2025 14:43:36
अनिल कांबळे
 
 

नागपूर,
Nagpur cattle fat warehouse raid कामठी मार्गावरील ताज लाॅनच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका गाेदामावर पाेलिसांनी छापा घातला. या छाप्यात पाेलिसांनी माेठ्या प्रमाणात गाेमांस, गाे-चरबी युक्त तूप, गायीचे सांगाडे, हाडे, कातडे आणि शिंगे जप्त केले. यावेळी संतप्त नागरिकांनी गाेमांस युक्त चरबीचे 30 डबे आणि शेकडाे चामडे नष्ट केले.
 
 

Nagpur cattle fat warehouse raid
कपीलनगर पाेलिस हद्दीतील भिलगाव पासून जवळच ताज लाॅनच्या पाठीमागील गाेदामात माेठ्या प्रमाणात गाेमांस, गाेचरबी युक्त तूप, गायीचे सांगाडे, हाडे, कातडे आणि शिंगांवर प्रक्रिया करून त्याची भुकटी, गाेमांस युक्त चरबीपासू तूप बनवले जात असल्याची माहिती एका संघटनेला मिळाली. संघटनेचे काही कार्यकर्ते गाेदामात धडकले. तिथे गायीच्या कातड्यांची माेठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे पाहून कार्यकर्ते संतापले. त्यांनी परिसरात आणखी शाेध घेतला असता तिथे एका ट्रकमध्ये 30 ते 40 डब्यांत गाे चरबीयुक्त तूप साठवल्याचे दिसताच कार्यकर्त्यांनी ते नष्ट करणे सुरू केले. त्याला परिसरातील काही नागरिकांनी विराेध केल्याने माेठ्या प्रमाणात गाेंधळ उडाला. याची माहिती मिळताच कपील नगर पाेलीस घटनास्थळी पाेचले. पाेलीसांच्या देखत कार्यकर्त्यांनी तीन ट्रकची ताेडफफाेड केली. या घडामाेडीत ट्रकचा चालक आणि वाहक फरार झाले.
 
 
 
एकावर गुन्हा दाखल
गाेमांस युक्त चरबी, कातडे आणि गायीच्या सांगाड्यांचा साठा करणारे हे गाेदाम अब्दुल हाीज शेख करीम (70) यांचे असल्याने पाेलिसांनी त्यांच्याकडे कागदपत्रे मागितली. करीम यांच्याकडे चामडे वगळले तर गाेमांस युक्त चरबी साठवण्याचा परवाना नसल्याने पाेलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे करीम यांच्यावर यापूर्वी 2016मध्ये अशाच स्वरूपाची कारवाई झाली हाेती.
Powered By Sangraha 9.0