राज्य शालेय नेटबॉल स्पर्धेत नागपूर विभाग अव्वल

21 Nov 2025 18:39:34
गोंदिया,
netball championship जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व महाराष्ट्र नेटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूर विभागाच्या मुलामुलींच्या संघ अव्वल ठरला
 

netball  
 
 
या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील २८८ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूर विभागाच्या मुलामुलींच्या संघाने दमदार खेळ करून विजेतेपद पटकावले. मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक नागपूर विभाग, द्वितीय कोल्हापूर विभाग व तृतीय पुणे विभाग तर मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमरंकनागपूर विभाग, द्वितीय पुणे विभाग तर तृतीय नाशिक विभागाच्या संघ राहिला.netball championship राखीव दलाचे पोलीस निरीक्षक राजेश सरोदे यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिराम मरस्कोले, महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, उपाध्यक्ष योगेश वाघ, संभाजीनगर नेटबॉल संघटनेचे सचिव ज्ञानेश्वर काळे, फोर्स वन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अरुण कावळे, नेटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे पवन पटले, क्रीडा अधिकारी अभय महल्ले, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक नाजुक उईके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेंद्र भांडारकर, निवड समितीचे सदस्य डॉ. नारायण मुर्ती यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0