मेडिकल शाॅपवर छापा : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी जप्त

21 Nov 2025 14:54:09
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur drug raid नशा करण्यासाठी वापरण्यात येणाèया प्रतिबंधित औषधींचा साठा असलेल्या इतवारीतील मेडिकल शाॅपवर पाेलिसांनी छापा घातला. या छाप्यात नशायुक्त औषधांचा साठा जप्त करण्यात आला. दाेघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
 

Nagpur drug raid 
तुषार पवन अग्रवाल (29, बालाजी मंदिर मार्ग, इतवारी) व भरतकुमार दीपककुमार अमरनानी (34, भिलगाव, कळमना) अशी आराेपींची नावे आहेत.तुषार अग्रवाल याचे इतवारीतील मासुरकर चाैकात भगवती मेडिकल शाॅप आहे. तरुणांकडून नशेसाठी वापर करण्यात येत असलेल्या औषधांची त्याच्याकडे विक्री हाेत असल्याची पाेलिसांना माहिती मिळाली. हा प्रकार अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक प्रशांत रामटेके यांना कळविण्यात आला. बुधवारी मध्यरात्री रामटेके यांच्यासह लकडगंज पाेलिस ठाण्याचे पथक औषध दुकानाजवळ पाेहाेचले.
डमी ग्राहक पाठवून Nagpur drug raid ऑनरेक्स कफ सायरप हे औषध मागविण्यात आले. ग्राहकाने इशारा केल्यावर पाेलिसांनी तेथे धाड टाकली. तेथे ऑनरेक्स कफ सायरपचे 59 व कुफफ्डेन कफ सायरपच्या 12 बाटल्या आढळल्या. दाेन्ही औषधांत नशेसाठी वापरण्यात येणारे काेडेन ाॅस्ेट हाेते. त्यानंतर पाेलिसांनी तुषारच्या घराची झडती घेतली. दाेन्ही ठिकाणाहून पाेलिसांनी 2.48 लाखांचा माल जप्त केला. हा माल कुठल्याही बिलाशिवाय भरतकुमार अमरनानीने पुरविल्याची माहिती तुषारने दिली. त्याच्या घरातून इतरही काही अवैध औषधे जप्त करण्यात आली आहेत. रामटेके यांच्या तक्रारीवरून दाेन्ही आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात अधिकारी संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0