अनिल कांबळे
नागपूर,
Ajni murder अजनी परिसरातील जयवंतनगर येथे निर्माणाधीन इमारतीतील एका खाेलीत 33 वर्षीय युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. मात्र, पाेलिसांच्या तपासात त्या युवकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हा खून त्याचा मित्र गणेश उईके याने केल्याचे पाेलिसांच्या तपासात समाेर आले. या प्रकरणी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. धनसिंग दरामसिंग उईके (33, रा.घुगली-छत्तरपूर, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. धनसींगच्या हत्याकांडाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून अनेक चर्चांना ऊत आला आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंतनगर परिसरात गाेल्हर यांच्या घरी बांधकामासाठी दाेन महिन्यांपूर्वी धनसिंग आणि त्याचा मित्र गणेश हे दाेघे नागपुरात आले हाेते. दाेघांनाही दारुचे आणि विडी पिण्याचे व्यसन हाेत. ते निर्माणाधिन इमारतीमधील एका खाेलीत लाेखंडी पत्र्यावर पाेते टाकून झाेपत हाेते. बुधवारी रात्री धनसिंग दारु पिऊन झाेपला हाेता. त्यापूर्वी त्याने विडी ओढली आणि जळती विडी पाेत्यावर पडली. यादरम्यान त्याला झाेप लागली. विडीमुळे पाेत्याला आग लागल्याने त्यामध्ये ताेसुद्धा जळाला. दुसèया एका मजुराला ताे जळालेल्या अवस्थेत दिसला. त्याने अजनी पाेलिसांना माहिती दिली. पाेलिसांनी प्राथमिक माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नाेंद केली
मित्रच निघाला खुनी
धनसिंग आणि गणेश यांच्या दारुच्या पैशावरुन वाद हाेता. त्यामुळे दाेघांत तीन दिवसांपूर्वीच भांडण झाले हाेते, अशी माहिती आहे. भांडणात धनसिंगने गणेशच्या कानाखाली मारली हाेती. त्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच गणेशने धनसिंग दारुच्या नशेत झिंग असताना त्याचा गळा आवळला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह जाळला. सध्या गणेश हा फरार झाला असून त्याचा शाेध सुरु आहे. ताेे मध्यप्रदेशात पळाल्याची माहिती समाेर आली असून अजनीचे ठाणेदार नितीन राजकुमार यांचे पथक त्याचा माग काढत आहेत.