कैद्याकडून पाेलिस हवालदाराला जीवे मारण्याची धमकी

21 Nov 2025 11:51:22
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur prison incident कच्चा कैदी म्हणून मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानाने धंताेली पाेलिस ठाण्याच्या पाेलिस हवालदाराशी गैरवर्तन करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार समाेर आला असून माेहम्मद शबीर उफर् चाकू अली माेहम्मद मेमन (35) असे धमकी देणाèया बंदीवानाचे नाव आहे. धंताेली पाेलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 18 नाेव्हेंबरला दुपारी 1 वाजता सुरक्षा विभाग कार्यालयाच्या आवारात घडली.
 

Nagpur prison incident  
मध्यवर्ती कारागृहात नियुक्त प्रशांत शंकरराव गायकवाड (29) हे मंगळवारी सुरक्षा विभागात कर्तव्यावर हाेते. काम करत असताना कच्चा कैदी माेहम्मद शबीर हा तिथे आला. त्याने कसलेही कारण नसताना पाेलिस हवालदार गायकवाड आणि तुरुंग अधिकारी शिंदे यांना शिवीगाळ सुरू केली. नंतर त्याने दाेघांनाही गाेळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने तत्काळ पाेलिसांना माहिती दिली. आराेपीविरुद्ध धंताेली पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आराेपी सध्या न्यायालयीन काेठडीत आहे आणि या नवीन तक्रारीच्या आधारे पाेलिस पुढील तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0