नागपूर,
Dr. Hedgewar Drama नादब्रह्मनिर्मित युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार नाटकाचे आठ सलग प्रयोग हाऊसफुल झाले. कवर्धा, रायपूर, भिलाई, रायगड, आंबिकापूर, बिलासपूर, कांकेर आणि जगदलपूर येथे प्रेक्षकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
नाटकात लो. टिळक, स्व. सावरकर, योगी अरविंद घोष व डाँ हेडगेवार यांच्या देशभक्तिप्रेरक संवादांचा समावेश होता. संघस्थापनेचे प्रसंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुराष्ट्रासाठी मार्गदर्शन प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले. सतीश खेकाळे यांनी डाँ हेडगेवार यांची भूमिका प्रभावीपणे सादर केली. Dr. Hedgewar Drama उपमुख्यमंत्री दिलीप शर्मा, अरुण साव, केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू व महापौर पूजा वधानी उपस्थित होते. आतापर्यंत ३० प्रयोग यशस्वीपणे संपन्न झाले असून पुढील प्रयोग मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश व ओडिशा येथे होणार आहेत.
सौजन्य: मंगेश बावसे, संपर्क मित्र