मानवी भावविश्वाचा एक दृश्य प्रवास दर्शविणार ‘फेसेस’

21 Nov 2025 17:11:11
नागपूर,
photography exhibition Nagpur भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि मानवी भावविश्वाचा एक दृश्य प्रवास दर्शविणारा एक आगळावेगळा फोटोग्राफी अनुभव ‘फेसेस’ या दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन दिनांक २२ व २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. फोटोग्राफर डॉ. अमित बिजोन दत्ता यांची ही दोन दिवसीय प्रदर्शनी प्रेस क्लब ऑफ नागपूर, सिव्हिल लाइन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीत देशभर फिरताना टिपलेल्या ५० मोठ्या आकाराच्या पोर्ट्रेट कॅनव्हासचा समावेश असून, रंगीत आणि कृष्णधवल अशा दोन्ही स्वरूपात मानवी अस्तित्वाचे नितळ दर्शन घडवणारे छायाचित्रे यामध्ये मांडण्यात आली आहेत. लडाखपासून केरळपर्यंत, गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारताच्या विविध भूभागातील लोकांची नैसर्गिक, निखळ आणि न सुशोभित भावमुद्रा या प्रदर्शनातून समोर येते.
 

photography exhibition Nagpur 
स्टुडिओच्या photography exhibition Nagpur चौकटीबाहेर, खऱ्या वातावरणात घेतलेली ही पोर्ट्रेट्स प्रत्येक व्यक्तीची कथा, संघर्ष, ओळख आणि सौंदर्याची अनोखी अनुभूती देतात. प्रदर्शनाबद्दल बोलताना डॉ. दत्ता म्हणतात, “फेसेस ही फक्त छायाचित्रांची मांडणी नसून भारताच्या जिवंत वारशाला अर्पण केलेली कला आहे, जिथे प्रत्येक चेहरा ओळख, धैर्य आणि सौंदर्य सांगतो.” मानवी भावना, सहानुभूती आणि भारतीय समाजरचनेतील नाती यांचा जवळून अनुभव देणारे हे प्रदर्शन नागपूरकरांसाठी दोन दिवसांची संस्मरणीय दृश्ययात्रा ठरणार आहे. दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनी सकाळी ११.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत रसिकांसाठी खुली राहणार आहे. नागपूरकरांनी जास्तीत जास्त सांख्यते उपथित राहून या जिवंत आणि हृदयस्पर्शी पोर्ट्रेट प्रदर्शनाचा अनुभव घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0