पाटणा,
Prashant Kishor's Gandhi Ashram बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागल्यावर, पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर मूक उपोषण करत आहेत. पश्चिम चंपारणमधील भितिहरवा गांधी आश्रमात त्यांनी २४ तासांपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान प्रशांत किशोर महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहत आहेत आणि त्यांच्या टीमच्या प्रमुख सदस्यांसह शांतपणे चिंतनात बसले आहेत. आश्रम परिसरात हजारो कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

प्रशांत किशोर यांनी उपोषणाचे स्वरूप राजकीय कार्यक्रम नसून "आध्यात्मिक प्रायश्चित्त" असल्याचे सांगितले. जनसुराजच्या तीन वर्षांच्या प्रवासानंतर संदेश जनतेपर्यंत का पोहोचला नाही, याचा आत्मपरीक्षण म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले, तर महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. एनडीएला २०२ जागा मिळाल्या, महाआघाडीला ३५ आणि जनसुराजला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने दिल्याबद्दल प्रशांत किशोर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, परंतु त्यांच्या सर्व दावे निष्फळ ठरले.