खरेदीची मर्यादा वाढवा;प्रहारचा सीसीआय कार्यालयावर मोर्चा

21 Nov 2025 21:44:38
अकोला,
protest-march : सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू आहे.मात्र जाचक अटींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून ५.६० क्विंटलची मर्यादा वाढवून एकरी ११ क्विंटल करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली.जिल्हाप्रमुख कुलदीप वसु यांच्या नेतृत्वाखाली आकोट ते अकोला पायदळ दिंडी काढून प्रहार कार्यकर्त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
 
kl
 
 
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कापसाचे उत्पादन घटले.याशिवाय शासनाने सीसीआय मार्फत हमीभावाने खरेदी सुरू केली आहे.दरम्यान जाचक अटींमुळे शेतकरी प्रचंड वैतागला आहे. तीन ते चार दिवस कापसाचे माप होत नसून ट्रॅक्टर उभे राहत आहेत शिवाय सामूहिक खरेदी बाबत सात बारा व घोषणापत्र घ्यावे मात्र बॉण्ड घेतल्या जात आहेत.आदी जाचक अटी रद्द व्हाव्यात या मागणीसाठी प्रहार ने आकोट ते अकोला पायदळ दिंडी काढली.सीसीआय च्या कार्यालयात धडक देत याठिकाणी ठिय्या आंदोलन केले.
 
 
त्यानंतर सीसीआयने प्रहार कार्यकर्त्यांना पत्र देत खरेदी ची मर्यादा राज्य शासनाच्या कृषी विभागाने ठरवून दिल्याचे लेखी दिले आहे.त्यामुळे ही मर्यादा वाढवून द्यावी अन्यथा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी करूम टॉवर चौक जाम करणार आहोत.असा इशारा यावेळी प्रहार कार्यकर्त्यांनी दिला.यावेळी जिल्हाप्रमुख कुलदीप वसू, महानगराध्य मनोज पाटील, छोटू कराळे, जीवन खवले, मुन्ना साबळे, ज्ञानेश्वर दहीभात, बिट्टू वाकोडे, भैय्या डीक्कर आदी उपस्थित होते.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा बंदोबस्त
 
दुपारी सीसीआय कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर प्रहार पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली.यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.जिल्हाधिकारी यांना सीसीआय खरेदी ची मर्यादा वाढविण्यासाठी यावेळी पदाधिकारी यांनी चर्चा सुद्धा केली.
Powered By Sangraha 9.0