पुलगावात वाढलेल्या आरक्षणाने तर्कवितर्क

21 Nov 2025 21:42:37
पुलगाव, 
pulgaon-reservation : वाढलेल्या आरक्षणामुळे पुलगाव नगरपालिकेची निवडणूक होणार की नाही असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणूक झाली तर वाढलेली आरक्षणाची टक्केवारी कशी तसेच निवडणूक स्थगित झाली तर प्रभागाची रचना कशी असणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
 
 
 
kl
 
 
 
जिल्ह्यात पाच नगरपालिकांची आरक्षणाची टक्केवारी ५० टयांपेक्षा कमी आहे. यामध्ये पुलगाव नगरपालिका अपवाद ठरली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ८ तर नगरसेवक पदासाठी १२३ उमेदवार रिंगणामध्ये पुलगाव नगरपालिकेच्या नामांकन अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. नगराध्यक्षपदासाठी कुणी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे १० प्रभागात १२३ उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गट व काँग्रेसची युती झाली. येथे काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उमेदवार उभे आहेत. महायुतीत भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना स्वतंत्र लढत आहे. बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी व अपक्ष मिळून आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी शर्यतीत आहे.
Powered By Sangraha 9.0