बँक अधिकाऱ्याने केला 1.32 काेटींचा घाेटाळा

21 Nov 2025 14:28:52
अनिल कांबळे

नागपूर,
Punjab National Bank fraud, पंजाब नॅशनल बँकेच्या एका अधिकाèयाने तब्बल 1.32 काेटींची आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब समाेर आली आहे. त्याने ग्राहकांच्या दस्तऐवजांमध्ये ेरार करत बनावट कागदपत्रांच्या नावाने नातेवाइकांच्या खात्यात कर्जाची रक्कम वळती केली. बेलतराेडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
 
 

Punjab National Bank fraud, 
अनुदीप Punjab National Bank fraud, मुंगरा (इंपेरिअर इस्टेट, श्रीहरीनगर, मानेवाडा) असे आराेपीचे नाव आहे. ताे मूळचा आंध्रप्रदेशमधील नेल्लाेर येथील रहिवासी आहे. ताे पंजाब नॅशनल बँकेत अ‍ॅसेसमेंट अधिकारी म्हणून लाेन सेंटरमध्ये कार्यरत हाेता. ग्राहकांची पर्सनल लाेनची कागदपत्रे बँकेत दाखल झाल्यानंतर, ती अनुदीपकडे पाठविली जात हाेती. अनुदीपने स्वत:च्या पदाचा दुरुपयाेग करून मनीषनगर, बेलतराेडी तसेच साेमलवाडा, ेटरी, खामला, इतवारी व वडधामना अशी वेगवेगळ्या शाखांमधून वैयक्तिक कर्जासाठी आलेल्या ाईल स्वत:कडे ठेवल्या. त्याने स्वत:च्या ओळखीच्या व्यक्तींच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या आधारे लाेन सेंटरमधून त्यांच्या नावावर वैयक्तिक कर्ज मंजूर केले. त्या रकमा त्याने स्वत:च्या तसेच नातेवाइकांच्या बँक खात्यावर वळत्या केल्या. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत त्याने अशा प्रकारे 1.32 काेटी रुपये वळते केले. हा प्रकार लक्षात येताच बँकेचे मुख्य व्यवस्थापक संताेषकृष्ण सत्यनारायणमूर्ती अन्नवर्पू यांच्या तक्रारीवरून अनुदीपविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेत राहून अनुदीप हा प्रकार करत हाेता, मात्र कुणालाही याचा सुगावा कसा काय लागला नाही की त्याच्यासाेबत इतरही कुणी सहभागी आहेत, असा सवाल उपस्थित हाेत आहे.हा प्रकार समाेर आल्यावर अनुदीपच्या इतर मंजूर कर्जांच्या ायलीदेखील तपासण्यात आल्या. तसेच अंतर्गत चाैकशीदेखील करण्यात आली. त्याच्या आधारे त्याला 6 मार्च 2025 राेजी निलंबित करण्यात आले हाेते.
 
 
 
हप्ते न भरल्याने झाला भंडााेड?
 
 
आराेपी अनुदीपने Punjab National Bank fraud, बनावट कागदपत्रांच्या आधारे वेंकट सरन कुमार नसीना येडूकाेंडालू व मनाेजकुमार मुंगरा यांच्या नावाने वैयक्तिक कर्ज मंजूर केले हाेते. मात्र, दाेन्ही कर्जदारांकडून हप्ते भरण्यात येत नव्हते. हा प्रकार बँकेच्या खामला शाखेचे व्यवस्थापक दिलीप साबळे यांच्या लक्षात आला. दाेन्ही व्यक्ती रेल्वे व भारतीय लघुउद्याेग विकास बँकेत कार्यरत असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत हाेते. दाेन्ही ठिकाणी चाैकशी केली असता अशा कुठल्याही व्यक्ती तेथे कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. अनुदीपने दाेघांच्या नावावर बनावट पे स्लीप्स व ाॅर्म 16 जाेडला हाेता.
Powered By Sangraha 9.0