तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Rani Lakshmibai Jayanti अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ नगरद्वारा बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महिला वसतीगृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सुखदा रश्मी संदीप कोरान्ने यांनी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनपटावर प्रभावी वक्तव्य सादर केले.यावेळी अभाविपच्या यवतमाळ विभाग छात्रा प्रमुख आर्या मिश्रा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.