शुभमन गिल खेळणार नाही!

    दिनांक :21-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Shubman Gill will not play भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल खेळू शकणार नाही, असे निश्चित झाले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात जखमी झालेल्या गिलच्या मानेला दुखापत झाल्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरणे अशक्य ठरले. गुरुवारी सरावास उपस्थित इतर खेळाडू मैदानात असताना गिल नसल्याची माहिती समोर आली. यानंतरच स्पष्ट झाले की त्याचा सहभाग जवळजवळ अशक्य आहे.

shubman gill
बीसीसीआयने त्याला संघातून वगळले असून, गिल आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेईल. लवकरच संघात नवीन कर्णधाराची घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. सध्या उपकर्णधार ऋषभ पंतला पुढील सामन्यात कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे. शुभमन गिल फक्त कसोटीतच नव्हे तर एकदिवसीय सामन्यांमध्येही टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. जर तो पुन्हा बरा झाला नाही, तर आगामी एकदिवसीय मालिकेसाठीही नवीन कर्णधाराची निवड करावी लागेल. गिलच्या परतीबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, आणि टीमच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू आहे.