सोहळ अभयारण्याचा होणार विकास !

21 Nov 2025 18:09:42
कारंजा लाड,
sohal sanctuary सोहळ अभयारण्याच्या विकासकामांबाबत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांच्या निवासस्थानी वन्यजीव विभागाच्या अधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून लवकरच या अभयारण्याचा विकासात्मक कायापालट होणार असल्याचे कळते.
 

sohal abhayranya 
 
 
या बैठकीत डीएफओ मांगुळकर तसेच आरएफओ अमीत शिंदे यांनी आमदार सई प्रकाश डहाके यांची भेट घेऊन अभयारण्याशी संबंधित विविध योजनांवर सविस्तर चर्चा केली.sohal sanctuary सोहळ अभयारण्याचा समग्र विकास, नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणार्‍या उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच भविष्यात पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने कोणते उपक्रम राबविता येतील, यावरही चर्चा झाली. लवकरच सोहळ अभयारण्य हा जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रकल्प म्हणून विकसित होईल, अशी माहिती या चर्चेदरम्यान देण्यात आली. या प्रकल्पाच्या कामाला नजीकच्या काळात प्रत्यक्ष सुरुवात होणार असून, त्यातून पर्यावरण संरक्षणासोबतच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0