वर्धा जिल्ह्यात रब्बी हंगामात २५ हजार हेक्टरवर पेरणी

21 Nov 2025 17:20:52
वर्धा,
wardha news जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आता शेतकर्‍यांच्या आशा रब्बी हंगामावर टिकून आहेत. जिल्ह्यात १ लाख १४ हजार ८७० हेटर क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी बी-बियाणे आणि खतांची उपलब्धता निश्चित करण्यावर कृषी विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत २५ हजार हेटर क्षेत्रात पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. या वर्षी रब्बी पिकांसाठी ४१ हजार ६२० विंटल बियाण्यांची मागणी होती. त्यापैकी २२ हजार ५३९.२ विंटल बियाण्यांचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला आहे.
 

रब्बी हंगाम  
 
 
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ९ हजार ९४७ विंटल बियाण्यांची विक्रीही झाली आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात साडेचार लाख हेटर क्षेत्रात कापूस, सोयाबीन आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली होती. मात्र, अनियमित पाऊस, रोगराई, कीड प्रादूर्भाव तसेच मधूनमधून झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील ६० ते ६५ टके पिके नष्ट झाली होती. शासनाकडून मिळालेली मदतही शेतकर्‍यांच्या मतं अपुरी ठरली असून खर्च देखील निघू शकला नाही. अशा कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. वाढलेल्या खत आणि बियाण्यांच्या किमतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. खरीप हंगामातील अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आता ते रब्बी पिकांच्या पेरणीवर लक्ष केंद्रित करत आहेत. वर्धा जिल्ह्यात ११ मोठे आणि मध्यम जलसाठे आहेत.wardha news जे शेतकर्‍यांच्या सिंचन समस्येवर मात करण्यास महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जलाशयांमध्ये उपयुत पाणीसाठा ९९ टके आहे. तरीही लघुसिंचन विभागाने कोणत्या जलाशयातून किती वेळा सिंचनासाठी पाणी सोडायचे याबाबत अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही. त्यामुळे रब्बी पिकांना सिंचन न मिळाल्यास शेतकर्‍यांचे आणखी नुकसान होण्याची शयता आहे. रब्बी हंगामात बहुतांश शेतकरी गहू आणि हरभरा पिकांची लागवड करतात.
Powered By Sangraha 9.0