विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

21 Nov 2025 18:13:50
चंद्रपूर, 
commits suicide येथील ‘जनता करिअर लॉन्चर’ या नावे शिकवणी वर्ग चालविणार्‍या संस्थेच्या वसतिगृहात राहणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.35 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रथमेश गुलाब चुदरी (17) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.
 

vidhyarthi galfas 
 
 
सकाळी 7.30 ते 9 वाजताच्या सुमारास प्रथमेशने जनता करिअर लॉन्चर येथील वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच, रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. प्रथमेशचे वडील गुलाब चुदरी (44, रा. धानोरा पिपरी) यांनी रामनगर पोलिस ठाण्यामध्ये तोंडी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, प्रथमेशने त्यांना सांगितले होते की, वसतिगृहाचे वार्डन आणि व्यवस्थापक, सल्लागार त्याला मानसिक त्रास देत आहेत आणि त्यामुळे त्याची मन:स्थिती ठीक नाही. कुटुंबियांनी त्याला समजावून शांत राहण्यास सांगितले होते.
तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपीं विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.commits suicide वार्डन लक्ष्मण चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटींग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे, प्राचार्य आशिष महातळे या चौघांविरुद्ध कलम 107, 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास रामनगर पोलिस करत आहेत. याबात प्राचार्य महातळे यांना विचारणा केली असता, हा विषय पोलिसांच्या तपासाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा असल्याने यावर काही बोलता येणार नाही, असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0