कारंजा (घा.),
bear attack आजपर्यंत तालुक्यात जंगलीं श्वापदं जंगल किंवा शेतात पाळीव प्राणी वा माणसावर हल्ले करीत होते. आता जंगली हिंस्त्र प्राण्यांनी थेट गावात प्रवेश करीत तिघांवर हल्ला केला. ही घटना तालुक्यातील हेटीकुंडी येथे काल गुरुवार २० रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
येथील माजी सरपंच दादाराव दुपारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अस्वलीच्या हल्ल्यात गावातील ओमशती साठे यांच्याकडे राहणारा गुराखी, ज्ञानेश्वर हिंगवे व चंद्रकला वाघमारे रा. हेटिकुंडी यांच्यावर हल्ला चढवीत अस्वलाने त्यांना जखमी केले. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी यांना कळविण्यात आली. तसेच जखमींना तात्काळ उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे हलविण्यात आले. कारंजा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता तिघांनाही नागपूर येथे रवाना करण्यात आले. घटनेची माहिती हेटीकुंडी येथील पोलिस पाटील दीपाली सोमकुवर यांनी दूरध्वनीद्वारे वनविभाग व पोलिस स्टेशनला कळवल्यानंतर वनविभागाचे पथक गावात आले. त्यांनी अस्वलाचा शोध सुरू केला.bear attack त्यांना अस्वलाच्या पायाचे ठसे आढळले. परंतु, अस्वल दिसली नाही. जवळपास दोन तास शोध मोहीम सुरू होती. सोबतच फटायाचा आवाज करीत गावातून अस्वलीला पळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावर निर्माण झाले आहे. हिंस्र प्राण्यांपासून गावकर्यांना संरक्षण मिळावे तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च वनविभागाने करावा अशी मागणी गावकरी करत आहे.